
यॉर्कर म्हटले की आपल्याला आठवतो श्रीलंकेचा लसीथ मलिंगा, टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट. पायाचा वेध घेणाऱ्या वेगवान चेंडूने फलंदाजाच्या यष्ट्या उडवण्याचे कसब या गोलंदाजात ठासून भरले आहे. पण यंदा आयपीएल 2020 मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सनरायझर्स हैद्राबाद संघाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याने.
तामिळनाडूतल्या सालेम जिल्ह्यातील चिन्नापम्पट्टी या गावचा असणाऱ्या टी. नटराजन याने बुमराह, बोल्ट यांना मागे खेचत यंदा सर्वाधिक यॉर्कर टाकले. या अनकॅप खेळाडूने अनेक आंतरराष्ट्रीय फलंदाजाना जखडून ठेवले आणि आपल्या ‘रॉकेट’ यॉर्करने त्यांच्या यष्ट्याही उडवल्या. एलिमीनेटर सामन्यात एबी. डिव्हीलिअर्स याचा त्रिफळा उडवला हा क्षण कायम क्रीडा चाहत्यांच्या लक्षात राहील.
https://twitter.com/itanutweets/status/1324786893918150656?s=19
हैद्राबादचे ‘पॅकअप’
आयपीएलच्या 13 व्या हंगामात दुसऱ्या क्वालिफायर लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागल्याने सनरायझर्स हैद्राबादसंघाचे आव्हान संपुष्टात आले. एका मागोमाग एक खेळाडू दुखापतग्रस्त झालेल्या हैद्राबादला नटराजन याने तारले. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमारची अनुपस्थिती त्याने जाणवू दिली नाही.
कामगिरी
टी. नटराजन याने आयपीएल 2020 मध्ये दमदार कामगिरी केली. 16 लढतीत तुणे 8.19 च्या इकॉनॉमी रेटने 16 बळी घेतले. डेथ ओव्हरमध्ये त्याने टिच्चून गोलंदाजी करत 12 बळी घेतले. त्याने नुसत्या विकेट्सच नाही घेतल्या, तर फलंदाजांना जखडून ठेवत धावाही कमी दिल्या.
IPL 2020 – नाव मोठे, पण कामगिरी सुमार! हे महागडे गोलंदाज ठरले यंदा सुपर फ्लॉप
बोल्ट, बुमराहपेक्षा वरचढ ठरला
आयपीएल 2020 मध्ये टी. नटराजन नवा यॉर्कर किंग म्हणून पुढे आला आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेत तब्बल 64 यॉर्कर टाकले. या यादीत जेसन होल्डर (25 यॉर्कर) दुसऱ्या, तर ट्रेंट बोल्ट (22 यॉर्कर) तिसऱ्या स्थानावर आहे.
इरफान पठाणने केले कौतुक
टी. नटराजन याची कामगिरी पाहून टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण प्रभावित झाला. नटराजन सारखा यॉर्कर फेकणारा अनकॅप खेळाडू आजपर्यंत आपण पाहिला नाही, असे ट्विट इरफान पठाण याने केले.

कोण आहे हा नटराजन?
नटराजन हा मूळचा तामिळनाडूतल्या सालेम जिल्ह्यातील चिन्नापम्पट्टी गावचा रहिवासी आहे. नटराजनचे वडील साडीच्या दुकानात रोजंदारीवर काम करतात, तर आई एक छोटसं चहाचे दुकान चालवते. वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत क्रिकेटचे स्टेडीयम न पाहिलेल्या नटराजन याने रणजी स्पर्धेत तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले आहे.
Photo story – IPL 2020च्या साखळी फेरीत ‘या’ 3 हिंदुस्थानी फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस
























































