IPL 2021 क्रीडा चाहत्यांसाठी खुशखबर, प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल 2021) उर्वरित सत्राची सुरुवात येत्या रविवारपासून होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर 19 सप्टेंबरला पहिला सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना आयपीएलचे सामने थेट मैदानात जावून पाहता येणार आहे. बीसीसीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत क्रीडा चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, चाहते 16 सप्टेंबरपासून तिकीट खरेदी करू शकणार आहेत. आयपीएलची अधिकृत वेबसाईट www.iplt20.com हे तिकीट उपलब्ध असणार आहेत. तसेच PlatinumList.net च्या मदतीनेही तुम्ही आयपीएलच्या लढतींचे तिकीट बूक करू शकता.

7 दिवसात 31 सामने

दरम्यान, आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेची सुरुवात 19 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या मॅचने होईल. ही मॅच दुबईत होणार आहे. आयपीएलच्या राहिलेल्या 31 मॅच 27 दिवसांत खेळवल्या जातील. यासाठी 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत मॅच होतील. एकूण 13 मॅच दुबईत, 10 मॅच शारजात आणि 8 मॅच अबुधाबीत होतील. सात दिवशी डबल हेडर असतील म्हणजे एकाच दिवशी दोन मॅच होतील.

IPL 2021 पूर्वी डिव्हिलिअर्सचं तुफान, 10 षटकार अन् 7 चौकारांची आतिषबाजी करत ठोकलं शतक

किती वाजता सुरू होईल सामना?

आयपीएलमध्ये डबल हेडर असल्यास पहिली मॅच हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसरी मॅच हिंदुस्थानी वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. ज्या दिवशी आयपीएलमध्ये एकच मॅच असेल त्या दिवशी मॅच हिंदुस्थानी वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल.

एकेकाळी ‘हा’ फलंदाज होता विराट कोहलीचा खास, रोहितमुळे लागला कारकिर्दीला ब्रेक