IPL 2023: राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपर किंग्सवर 32 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल 2023 च्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 32 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाने दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला आहे. यापूर्वी देखील राजस्थानकडून चेन्नईचा तीन धावांनी पराभव झाला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला शिवम दुबेच्या अर्धशतकी खेळीमुळे 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 170 धावा करता आल्या.

राजस्थानकडून यशस्वीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 43 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. तर चेन्नई सुपर किंग्सकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक दोन बळी घेतले.

प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी झाली. जोस बटलर 21 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. कर्णधार संजू सॅमसन 17 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वाल 43 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. शिमरॉन हेटमायर 10 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. यानंतर ध्रुव जुरैल आणि देवदत्त यांनी दमदार फलंदाजी करत संघाला 200 च्या पुढे नेले. जुरेल १५ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. तर देवदत्त पडिक्कलने 13 चेंडूत 23 धावा करत नाबाद राहिला.