IPL 2025 – पंजाबविरुद्ध रोहित शर्माची विस्फोटक फलंदाजी अन् विक्रमांचा पाऊस, वाचा…

IPL 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने सर्वांचीच मन जिंकली. त्याने 50 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. त्याने फक्त 28 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं. याचसोबत त्याने आयपीएलमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच आयपीएलमध्ये 300 षटकार ठोकण्याचा पराक्रम सुद्धा केला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 266 सामन्यांमध्ये 39.53 च्या सरासरीने 8618 धावा केल्या आहेत. यानंतर आता रोहित शर्माचा नंबर असून त्याने 266 सामन्यांमध्ये 7000 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू क्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीमध्ये 357 षटकार ठोकले आहेत. या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 300 षटकार ठोकले आहेत. रोहितचा हाच फॉर्म पंजाबविरुद्ध कायम राहिल्यास मुंबईला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी अधिकच बळ मिळेल.

IPL 2025 – रोहित फॉर्मात आलाय, मुंबईच चॅम्पियन होणार…; इंग्लंडच्या माजी खेळाडूच भाकीत