
गेली 18 वर्षे कोहली ज्या स्वप्नाचा पाठलाग करतोय, त्या स्वप्नपूर्तीचे ध्येय समोर उभे ठाकले आहे. विराटचा जबरदस्त फॉर्म आणि बंगळुरूचे शिलेदार विजेत्यांच्या थाटात करत असलेला खेळ संघाला नवा विजेता बनवूनच थांबणार आहे. पंजाबविरुद्ध विजय मिळवून हजारो चाहत्यांच्या उत्साहात त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून, फायनलमध्येही याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची करण्यासाठी बंगळुरूचे शिलेदार उत्सुक असतील. कोहलीने (614 धावा) यंदाही नेहमीसारखे प्रभावी प्रदर्शन करत संघाच्या फलंदाजीचा कणा मजबूत केला आहे. त्याने केवळ स्वतःच्या कामगिरीवर लक्ष पेंद्रित न करता बंगळुरू संघाचा आधारस्तंभ बनण्याचे काम केले आहे. गेल्या वर्षीही कोहलीने दर्जेदार खेळी साकारली होती, मात्र यंदा फिरून तो जास्त परिपक्व आणि संयमी फलंदाज म्हणून समोर आला आहे. त्याच्यासोबत कर्णधार रजत पाटीदार, मयांक अगरवाल यांच्यासारखे अनुभवी फलंदाजांनी संघाला मोक्याच्या वेळी मदतीचा हात दिला आहे. बंगळुरूसाठी मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल हे गोलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ असतील.