
IPL 2025 ची फायनल मंगळवारी (3 जून 2025) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे. पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे संघ विजेतेपदासाठी आपापसात भिडतील. फायनलसाठी BCCI नेही जय्यत तयारी केली असून समारोप समारंभाची थीम “Operation Sindoor” ठेवण्यात आली आहे. फायनलचा थरार प्रत्यक्ष स्टेडियममध्ये बसून अनुभवण्यासाठी चाहत्यांमद्ये सुद्धा उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच उत्सुकतेचा फायदा घेत विमान कंपन्यांनी सुद्धा तिकीटांच्या किंमतींमध्ये 25 हजार रुपयांची वाढ केली आहे.
मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि चंदीगढवरून अहमदाबादला जाण्यासाठी क्रिडा प्रेमींना 25 हजार रुपये मोजावे लागणार आहे. आयपीएलच्या फायनलचा फायदा घेत विमान कंपन्यांनी तिकीटांच्या दरात वाढ केली आहे. इतर दिवशी 3,500 ते 5,000 रुपयांपर्यंत तिकीटांची किंमत असते. मात्र, आयपीएल फायनलच औचित्य साधत विमान कंपन्यांनी आपलाही खिसा गरम करण्याचा निश्चय केला आहे. एकीकडे विमान कंपन्यांनी तिकीटांच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे तर, दुसरीकडे नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुद्धा 80,000 सीट्स बुक झाल्या आहेत. 1.32 लाख इतकी स्टेडियमची आसन क्षमता आहे. यापैकी 25,000 सीट्स या आरक्षित आहेत.