ओन गोलने मोरोक्कोचा घात, इराणची विजयी सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मॉस्को

मोरोक्को-इराण यांच्यामधील फिफा फुटबॉल वर्ल्ड कप लढतीचा थरार शुक्रवारी सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममध्ये रंगला. उभय संघांमधील लढत गोलशून्य बरोबरीत राहील अशी चिन्हे निर्माण झाली असतानाच मोरोक्कोच्या अझीझ बॉहादौजकडून ९५व्या मिनिटाला गोलपोस्टजवळ चूक घडली. त्याच्याकडून ‘ओन गोल’ झाला  अन् आशिया खंडातील इराणच्या फुटबॉल संघाने ‘ब’ गटातील ही लढत १-० अशा फरकाने जिंकत गुणांचे खाते उघडले.