इस्लामाबादेत हिंदुस्थानी दूतावासावर ड्रोनच्या घिरटय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

हिंदुस्थानी हवाई दलाच्या तळावर ड्रोनहल्ला करणाऱया पाकिस्तानने त्याच दिवशी इस्लामाबादेतील हिंदुस्थानी दूतावासालाही टार्गेट बनवल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. पाकिस्तानी ड्रोनने थेट दूतावासाच्या आवारात घिरटय़ा घातल्या. दूतावासात सुरू असलेल्या कार्यक्रमाची गोपनीय माहिती आणि फुटेज मिळवण्याचे पाकिस्तानचे षड्यंत्र होते. सुरक्षेतील या गंभीर उल्लंघनावर हिंदुस्थानने पाकिस्तानकडे तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

इस्लामाबादच्या अतिसुरक्षित क्षेत्रात असलेल्या हिंदुस्थानी दूतावासाच्या आवारात 26 जूनला हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. या दिवशी दूतावासामध्ये परराष्ट्र संबंधाविषयी कार्यक्रम सुरू होता. अरनिया प्रांतात ड्रोनच्या घुसखोरीचा डाव उधळला

जम्मू-कश्मीरातील अरनिया प्रांतामध्ये शुक्रवारी पहाटे 4 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास पाकिस्तानी ड्रोनने आंतरराष्ट्रीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र सीमा सुरक्षा बलांनी (बीएसएफ)गोळीबार करून त्या ड्रोनला मागे पिटाळले. दहशतवाद्यांनी हिंदुस्थानच्या सीमेवर टेहळणीसाठी हा ड्रोन पाठवल्याचा बीएसएफला दाट संशय आहे. याआधी रविवारी रात्री कालूचक लष्कर तळावर ड्रोन दिसला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी रात्री सुंजवान लष्कर तळाच्या आवारात संशयास्पद ड्रोन फिरताना दिसला होता.