
अमेरिका, इस्रायल-इराणच्या युद्धात जागतिक चिंता वाढली आहे. अनेक देशात इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच या युद्धात इराणचेही प्रचंड नुकसान झाले आहे. तरी इराणे तेलाच्या व्यापारातून जबरदस्त कमाई केली आहे. या संकटाच्या काळात इराण तेलातून दररोज १३९ दशलक्ष डॉलर्स कमावत आहे, असा दावा अका अहवलाता करण्यात आला आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या काही व्यापारी जहाजांवर २ दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे ‘ट्रान्झिट शुल्क’ (वाहतूक शुल्क) आकारून इराण अतिरिक्त उत्पन्नही मिळवत आहे. युद्धाच्या सुरुवातीपासून तेलाच्या दरातील चढ-उतारांमुळे इराणला दुहेरी फायदा होत आहे.
युद्धाच्या सुरुवातीपासून तेलाच्या विक्रीतून इराणने कदाचित शेकडो दशलक्ष डॉलर्सचे अतिरिक्त उत्पन्न कमावले आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करू शकणारा एकमेव प्रमुख तेल निर्यातदार देश बनल्यामुळे, इराणच्या कच्च्या तेलाच्या (क्रूड) किमतीत झालेल्या वाढीचा त्याला फायदा झाला आहे.
युद्धाच्या सुरुवातीपासून तेलाच्या दरातील बदलांमुळे इराणला दुहेरी फायदा होत आहे. इराणच्या प्रमुख दर्जाचे कच्चे तेल (flagship crude grade) ग्राहकांना ज्यामध्ये प्रामुख्याने चीनमधील ग्राहकांचा समावेश आहे. हे तेल ‘ब्रेंट’ (Brent) तेलाच्या तुलनेत १० महिन्यांहून अधिक काळातील सर्वात कमी सवलतीच्या दरात विकले जात आहे. शिवाय, तेलाचा जागतिक मापदंड मानल्या जाणाऱ्या ‘ब्रेंट’ तेलाची किंमतही बॉम्बहल्ला सुरू झाल्यापासून १०० डॉलर्स प्रति बॅरलच्या वर गेली आहे.
या महिन्यात इराणची तेल निर्यात युद्धापूर्वीच्या पातळीच्या (सुमारे १.६ दशलक्ष बॅरल्स प्रतिदिन) जवळपासच राहिली असल्याचा अंदाज आहे. इराणचे कच्चे तेल वाहून नेणारी जहाजे ‘खार्ग बेटा’वरील (Kharg Island) टर्मिनलवर तेल भरून घेत आहेत आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीमार्गे पर्शियन आखातातून बाहेर पडत आहेत आणि अलीकडच्या काळात या हालचालींनी अधिकच वेग घेतला आहे. आखातातील इतर तेल उत्पादक देशांच्या तेल निर्यातीवर लादण्यात आलेल्या प्रभावी नाकेबंदीमुळे इराणची चांगली कमाई होत आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर दररोज हवाई हल्ले चढवून त्याला जेरीस आणले असले, तरीही इराणची आपली आर्थिक जीवनवाहिनी अबाधित राखण्याची क्षमता पाहून त्यांचे लष्करी प्रयत्न काहीसे निष्प्रभ ठरले आहेत. तेलाच्या किमतींवर युद्धाचा होणारा परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने, वॉशिंग्टनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी टँकर्समधून आधीच समुद्रात निघालेल्या इराणच्या तेलाच्या साठ्यावरील निर्बंध तात्पुरते स्थगित केले आहेत. या निर्णयामुळे इराणला आणखीही अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
इराणने मार्चमध्ये आतापर्यंत आपल्या मुख्य इराणी लाइट क्रूड मिश्रणाच्या विक्रीतून दररोज सुमारे १३९ दशलक्ष डॉलर्स कमावले असतील, जे फेब्रुवारीतील ११५ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंटच्या तुलनेत इराणच्या तेलाचे मूल्य वाढले आहे, आणि या आठवड्याच्या सुरुवातीला प्रति बॅरल २.१० डॉलर्सची सूट मिळाली आहे, जी जवळपास एका वर्षातील सर्वात कमी आहे. युद्धापूर्वी हा फरक १० डॉलर्सपेक्षा जास्त होता.
प्रत्येक बॅरलला मिळणारी जास्त विक्री किंमत इराणसाठी महत्त्वाची आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे आणि आपल्या उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी व तिला आधार देण्यासाठी देशाला मोठी गुंतवणूक करावी लागेल. देशाने मध्य पूर्वेतील प्रतिशोधात्मक हल्ल्यांमध्ये अनेक शस्त्रेही वापरली आहेत, ज्यांची पुन्हा भरपाई करणे आवश्यक असेल.
इराक आणि कुवेतसारख्या देशांना उत्पादनात मोठी कपात करण्यास भाग पाडले जात असताना आणि संयुक्त अरब अमिराती व सौदी अरेबिया पर्यायी निर्यात मार्गांचा वापर करण्यासाठी धडपडत असताना, इराणने टँकर भरून त्यांना पर्शियन आखातातून समुद्रात पाठवणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे इराणची दुहेरी कमाई होत आहे.




























































