
मुंबई मेट्रो मार्ग-3 अॅक्वा लाईनवर मोबाईल नेटवर्कचा प्रश्न आता सुटणार आहे. अॅक्वा लाईनवर कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू होणार आहे. अॅक्वा लाईनवरील इन-बिल्डिंग सोल्युशन्स पायाभूत सुविधांची उभारणी, संचालन आणि देखभाल करण्यासाठीचे स्वीकृती पत्र संयुक्तपणे भारती एअरटेल लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेड यांना प्रदान करण्यात आले आहे.
भुयारी मेट्रोच्या प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्क गायब असते. त्यामुळे प्रवाशांना भुयारी मेट्रो प्रवासात इतरांशी संपर्क साधणे मुश्किल होते. मोबाईलचे नेटवर्क नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवणे कठीण बनते. या पार्श्वभूमीवर मोबाईल कनेक्टिव्हीटी सुधारण्याची मागणी जोर धरत होती. अखेर प्रशासनाकडून मोबाईल कनेक्टिव्हीटी सुधारण्यासंदर्भात प्रक्रिया पुढे सरकली आहे. त्यामुळे नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.





























































