
जालना शहरातील मोतीबाग चौपाटीजवळ आज 11 फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास बोलोरोने मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. यात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शहरातील चौपाटी येथे आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बोलेरो जीप क्रमांक एम एच 45 एन 1383 ने दुचाकी क्रमांक एम एच 21 बी के 7109 ला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. जालना तालुक्यातील बठान येथील ऋषिंदर रामदास शिरसाट ( 34) असे मृताचे नाव असून मुलगी अर्चना शिरसाट व पत्नी राधा शिरसाट, बोलेरो जीप मधला विकास तिवारी अशी जखमींचे नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, जखमींची प्रकृती गंभीर असल्याने जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
































































