जालन्यातील हातवन येथे दिसला बिबट्या, मंठा तालुक्यात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात हातवन येथे शेतात एका ट्रॅक्टर चालकाला बिबट्या आढळून आल्याने शेत वस्ती व शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे. मंठा तालुक्यातील हातवन तसेच परतूर तालुक्यातील श्रीधर जवळा भागात हा बिबट्या आढळून आला.

ट्रॅक्टर चालक सुनील काळे हे मंगळवारी दहाच्या सुमारास ट्रॅक्टर चालवत असताना अचानक लाईट समोर बिबट्या दिसल्याने त्यांनी या बिबट्याचे व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने मंठा तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. दुधना नदीवर धरण आहे. त्यामुळे नदीच्या काठाने परिसरामध्ये वन्यप्राणी दिसण्याची संख्या वाढत आहे.