जालन्यात विवाहितेवर अत्याचार करून संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पतीला पाठवल्या, पतीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे एका विवाहितेवर अत्याचार करून फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग तिच्या पतीला पाठवल्यानंतर पतीने आत्महत्या केली. यानंतर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिलांनी पीडीतेला रवी दत्तात्रय सपकाळ यांच्याशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्याचे चित्रीकरण मोबाईल मध्ये केले. शिवाय तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात आले. या सगळ्या प्रकारानंतर पीड़ित महिला आणि संबंधित संशयित आरोपी तरुण यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पीडीत महिलेच्या पतीला पाठवल्या. त्यामुळे बदनामी झाल्याच्या समाजातून पीड़ित महिलेच्या पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर पीडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार पारध पोलीस ठाण्यात गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिला विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे बलात्कार, विनयभंग आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेकर करीत आहेत.