
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात 19 नोव्हेंबर रोजी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे वेचणीस आलेल्या कापसाचे ं नुकसान झाले आहे. आंबिया बहराच्या तानावर असलेल्या डाळिंब, मोसंबी आदी फळबागांना ताण बसणार नसल्याने या फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
वडीगोद्रीसह परिसरात गुरुवारी रात्री अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रात्री साडेनऊ दहाच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसाचा शेतीतील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या समोर अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. या अवेळी पडलेल्या पावसाने शेऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शुक्रवारी ही दिवसभर ढगाळ वातावरणा असल्यामुळे परत अवकाळी कोसळतोय की काय या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरिपातील कपाशी तर रब्बी ज्वारीही जोरदार वाऱ्याने आडवी झाली आहे.कपाशी व ज्वारी या पिकाला मोठा तडाखा बसला आहे. तसेच डाळिंब व मोसंबी या फळपिकांना ही या अवकाळी चा फटका बसणार असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या ऊस तोडीचा हंगाम असल्याने ऊस तोड मजूर उसाच्या फडातच वास्तव्यास आहेत. या अचानक आलेल्या
अवकाळी पावसामुळे या मुलेबाळे, महिला व ऊसतोड मजुरांची तारांबळ उडाली होती. तर अनेक मजुरांनी खोप्या बनवल्या नसल्याने त्यांना या पावसात भिजावे लागले.

























































