भाजप नेत्यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या हिजबुलच्या कमांडरचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

जम्मू कश्मीरमधील श्रीनगर शहरात सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर सैफुल्लाह याचा खात्मा करण्यात आला आहे. या सैफुल्लाने जम्मू कश्मीरमधील भाजप नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता.

श्रीनगरमधील रंगरेथ परिसरातील एका घरात हे दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जवानांना दिली होती. त्यानंतर या भागात जम्मू कश्मीर पोलीस व सीआरपीएफ जवानांनी शोध मोहीम सुरू केली.

फुटिरतावाद्यांकडून आंदोलन

या मोहिमेदरम्यान काही स्थानिक फुटिरतावाद्यांनी हिंसक प्रदर्शन करत शोध मोहिम थांबविण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी सीआरपीएफ जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले.

पळून जाण्याच्या प्रयत्नात मारला गेला

त्यानंतर पुन्हा शोधमोहिम सुरू झाल्यावर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या चकमकीत हिजबुलचा टॉपचा कमांडर सैफुल्लाह उर्फ गाजी हैदर याचा खात्मा करण्यात आला.

रियाझ नायकूनंतर सांभाळलेली कमान

सैफुल्लाह हा मूळचा पुलवामा जिल्ह्यातील मंगलपोरा गावातील रहिवासी होता. हिजबुल प्रमुख सय्यद सलाउद्दीनच्या सांगण्यावरून तो संघटनेत सहभागी झाला होता. याआधीचा हिजबुलचा कमांडर रियाझ नायकूच्या खात्म्यानंतर सैफुल्लाहने संघटनेच्या कमांडर पदाचा कारभार सांभाळला होता.