जम्मूत दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. नरेश बडोले असे त्या हुतात्मा जवानाचे नाव असून ते जम्मूत आपले कर्तव्य बजावत होते. नरेश बडोले हे नागपूर तुकडीच्या सीआरपीएफ दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. नरेश बडोले यांना जम्मू येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरवरण आले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांवर हा मोठा हल्ला केला. बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्त पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये सीआरपीएफच्या 117 बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते. उपचारादरम्यान ते शहीद झाले.

नरेश बडोले मुळचे नागपूरचे होते. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बंदिपोरा परिसरात गुरूवारी पहाटे साडे सात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला. गोळीबारात नरेश बडोले गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी नरेश बडोले यांची रायफल घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. नरेश बडोले यांना तात्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं.