या देशांतील कंपन्यामध्ये ‘चश्मीष महिलांना’ नो एन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चश्मा घातलेल्या महिला कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्याचा फटका कंपनीच्या उत्पादनांना बसत असल्याने जपानच्या काही कंपन्यांनी चश्मा असणाऱ्या महिलांना नोकरी देण्यास नकार दिला आहे.

जपानी प्रसारमाध्यमांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार काही रिटेल कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या चश्मा वापरण्यावर आक्षेप घेतला आहे. चश्मा वापरणाऱ्यावर महिलांना बघून ग्राहक निराश होतात. असा दावा या कंपन्यानी केला आहे. पण विशेष म्हणजे पुरुषांच्या चश्मा वापरणाऱ्यावर मात्र बंदी घालण्यात आलेली नाही. यामुळे महिला व पुरुषांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप महिला कर्मचारी करत आहेत. त्यातही येथील डिपार्टमेंट स्टोर आणि शोरुममधील रिसेप्शन, व्यवस्थान, ब्युटी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या चश्मा वापरणाऱ्यावर विशेष बंदी घातली आहे. यावर कंपन्या महिलांच्या सक्षमतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर कंपन्याच्या या विचित्र भूमिकेवर टीकेची झोड उठली आहे. #glassesareforbidden यावर नेटकरी कंपन्यांचा विरोध करत आहेत.