मराठी भाषिकांबरोबर नसल्याचे फडणवीसांनी सिद्ध केले – जयंत पाटील

महाराष्ट्रात गेली पाच वर्षे सत्तेत असताना भाजपने सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच येथील मराठी भाषिकांच्या मागण्या आणि अपेक्षांकडे नेहमी दुर्लक्षच केले होते. आता भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे येऊन आपण मराठी भाषिकांबरोबर नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री जयंत पाटील म्हणाले, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समस्त मराठी भाषिकांचे पुन्हा एकदा एकत्रीकरण झाले आहे. महाराष्ट्राला जोडले जाण्याच्या त्यांच्या इच्छेचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा यासाठी राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभा आहे. महाराष्ट्रातील सर्वांचाच शुभम शेळके यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे. शुभम शेळके यांच्या रूपाने येथील मराठी भाषिक संघर्ष करीत आहेत. त्यांचा एक चांगला मिलाफ झाला आहे, मात्र येथे येऊन देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम केल्याचा घणाघातही जयंत पाटील यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या