बीडचे रूप झपाट्याने बदलणार आहे, जयदत्त क्षीरसागरांनी व्यक्त केला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jaydutt-kshirsagar

सामना प्रतिनिधी । बीड

बीडचा विकास डोक्यात ठेऊनच कामाला लागलो आहोत. अनेक प्रकल्प आता मार्गी लागत आहेत. 18 कोटी रूपयांच्या बसस्थानकाचा शुभारंभ आज होत आहे. 200 खाटाचे रूग्णालय देखील होणार आहे. बीडचे रूप झपाट्याने बदलणार आहे. फक्त तुमची साथ हवी आहे. उद्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे बीडमध्ये येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजच्या जुन्या आणि नव्यांचा संगम ही नांदी ठरणार आहे. आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहायचे आहे असे आवाहन रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे बीडमध्ये आगमन होत आहे. नवगण कॉलेजच्या प्रांगणात महिला आणि विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर बीडच्या नव्या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर आज रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसैनिक आणि कार्यकत्र्यांसोबत तयारीचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, लोकांनी भरभरून मते दिली. त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मते दिली नाहीत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे बीडमध्ये येत आहेत. या अनुषंगाने आज नव्या आणि नव्यांचा संगम ही नांदी ठरणार आहे. एकत्र येण्यासाठीच आदित्य ठाकरेंचा दौरा आहे. त्यांच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहायचे आहे. महिला आणि विद्यार्थीनींनी नवगण कॉलेजच्या प्रांगणात तर पुरूष आणि युवकांनी बसस्थानकाच्या कार्यक्रमासाठी यायचे आहे असे आवाहन करत जयदत्त क्षीरसागर पुढे म्हणाले, अनेक प्रकल्प आता मार्गी लागले आहे, २०० खाटाचे रूग्णालय देखील होणार आहे. वॉटरग्रीडमधून बीड जिल्ह्याला वगळण्यात आलेले नाही. येडशी ते जालना रेल्वे मार्गासाठी आपण आग्रही आहोत. तब्बल ६०० शेतकऱ्यांच्या मावेजाचे प्रकरण आपण निकाली काढले आहेत. शेतकNयांना योग्य मावेजा मिळाला पाहिजे, वाढीव मावेजाची रक्कम देखील दिवाळीपर्यंत मिळेल यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मुलभूत आणि पायाभूत विकासाची कामे करण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी म्हटले. यावेळी बैठकीला जिल्हाप्रमुख वुंâडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, जगदीश काळे, विलास बडगे, दिनकर कदम, दिलीप गोरे, बप्पासाहेब घुगे, जयसिंग चुंगडे, बाळासाहेब आंबुरे आदी उपस्थित होते.