जेईई-मेन चौथे सत्र आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आयआयटी आणि तत्सम संस्थांमधील इंजिनियरींग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया जेईई-मेन परीक्षेचे चौथे सत्र  आज 26 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्या परीक्षेची प्रवेशपत्रे राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करून ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी परीक्षा पेंद्रांची संख्या 660 वरून 828 इतकी वाढवण्यात आली आहे. 334 शहरांमध्ये ही पेंद्रे असणार आहेत. 26, 27 आणि 31 ऑगस्ट तसेच 1 आणि 2 सप्टेंबर असे पाच दिवस ही चौथ्या सत्रातील परीक्षा सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी दोन तास अगोदर परीक्षा केंद्रांवर हजर रहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.