जेट अधिकच संकटात, जेट अधिकच संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आर्थिक संकटात सापडलेली जेट एअरवेज कंपनी आता देणी न दिल्याने अधिकच गाळात रुतली आहे. सोमवारी रात्री जेटची चार विमाने जमिनीवरच ठप्प झाली. परिणामी 20 उड्डाणे रद्द करावी लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

जेटने लेसर्सचे बिल अदा केलेले नाही. म्हणूनच मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नई विमानतळावर जेटची बोइंग 737 विमाने जमिनीवरच राहिली. लेसर्स हे विमाने पट्टय़ावर उभे करण्याचे काम करतात. त्यांचे पैसेच कंपनीने न दिल्याचा त्यांचा दावा आहे. लेसर्स आणि विमानांचे मेन्टेनन्स करणाऱया कंपन्यांना देण्यासाठी जेटकडे पैसेच नसल्याने जेट संकटात सापडली आहे.

स्टेट बँक 15 टक्के शेअर्स घेणार
स्टेट बँक ऑफ इंडिया जेट एअरवेजमधील 15 टक्के शेअर्स घेणार असे वृत्त आहे. स्टेट बँकेने जेटला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात ही हिस्सेदारी मिळणार आहे. जेटने 21 फेब्रुवारीला भागधारकांची बैठक बोलावली असून त्यात हा प्रस्ताव ठेवला जाईल. जर बैठकीत प्रस्ताव मंजूर झाला तर कर्ज देणाऱयांना 30 टक्के, जेटची भागीदार कंपनी एतिहादला 40 टक्के शेअर्स मिळू शकतात. परिणामी 51 टक्के शेअर्सचे मालक असलेले जेटचे चेअरमन नरेश गोयल यांच्याकडे 20 टक्केच शेअर्स राहतील. जेट एअरवेजला पहिल्या तिमाहीत 3656 कोटींचा तोटा झाला असून कंपनीवर 10, 900 कोटींचे कर्ज आहे.