
सामना ऑनलाईन। रांची
झारखंड मधील दुमका य़ेथे सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून यात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर 1 जवान शहीद झाला आहे. या चकमकीत 4 जवान जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला हेलिकॉप्टरमधून रांची येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर इतर 3 जवानांवर दुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीरज क्षत्री असे शहीद जवानाचे नाव असून तो आसाम रेजिमेंटचा जवान आहे.
दुमका भागात तीन ते चार दिवसांपासून 14-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस व सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्तपणे एक मोहिम आखली. यावेळी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. यावेळी एका जवान शहीद झाला असून 4 जवान जखमी झाले.
Superintendent of Police, Y S Ramesh : In an encounter with Naxals in Dumka, 1 jawan has lost his life and 4 others are injured. According to our information 4-5 Naxals have been shot. #Jharkhand pic.twitter.com/f5yjENH6zH
— ANI (@ANI) June 2, 2019





















































