Jio Welcome Offer: Jio देतेय 5G ची मोफत सेवा… जाणून घेऊया 5G सेवा मोफत कशी मिळवायची

Reliance Jio ने 5G सेवा गेल्याच महिन्यात लॉन्च केली. देशातील अनेक शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. Jio True 5G हे अजूनही बीटा फेजमध्ये असल्याने केवळ निवडक युजर्सना इनवाईटद्वारे 5G उपलब्ध केले जात आहे. सध्या रिलायन्स जिओची 5G सेवा दिल्ली – एनसीआर, मुंबई, कोलकत्ता, वाराणसी, चेन्नई, बेंगळरू आणि हैदराबादमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने 5G वापरासाठी एक वेलकम ऑफर ठेवली आहे. पण ही ऑफर जिओच्या सगळ्या युजर्ससाठी नसून, काही निवडक युजर्संनाच याचा लाभ घेता येणार आहे.

या ऑफरचा फायदा घ्यायचा असल्यास युजर्सकडे jio 5G तंत्रज्ञान असलेला मोबाईल असणे गरजेचे असेल. या व्यतिरिक्त 5G नेटवर्क कवरेज परिसरात असणे गरजेचे असेल. तसेच युजर्सच्या जिओ नंबर वर 239 रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रूपयांचा रिचार्ज केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ही सेवा उपलब्ध होईल. या ऑफरसह, युजर्सना 1Gbps पर्यंत स्पीडसह अमर्यादित 5G डेटा दिला जात आहे.

कशी मिळणार 5G ची मोफत सेवा?

सध्या जिओची 5G सर्विस ही इनव्हिटेशनवर आधारित आहे. त्यामुळे जरी आपण सर्विस उपलब्ध असलेल्या शहरात असाल तरीही इनव्हिटेशनशिवाय 5G वापरता येणार नाही. कंपनीच्या मते या सेवेसाठी युजर्सना नवीन सिम कार्ड घेण्याची काही गरज नाही. म्हणजेच युजरच्या प्रीपेड किंवा पोस्टपेड सिमकार्डवर 239 रूपये किंवा त्याहून अधिक रिचार्ज केल्यास तुम्हाला कंपनीतर्फे आपोआप इनव्हाईट पाठविले जाईल.

जर तुम्ही सेवा प्रदान केलेल्या शहरामध्ये राहत असाल तर माय जिओ अ‍ॅपवर तुम्ही पाहू शकता. इनव्हिटेशन मिळविण्यासाठी 5G स्मार्टफोन असण्याची गरज आहे. सध्या ही सेवा उपलब्ध नसलेल्या शहरांमध्ये 5G लाँच केल्यानंतर, कंपनी नवीन योजना लॉन्च करू शकते. तोपर्यंत वापरकर्ते विनामूल्य 5G वापरू शकतात. त्याची सेवा वापरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये n28, n78, n258 बँड असणे आवश्यक आहे, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.