फसवणुकीच्या गुह्यात तैवानी नागरिकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरीच्या नावाखाली पालिका कर्मचाऱ्याची 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तैवान देशाच्या नागरिकाला उत्तर प्रादेशिक सायबर विभागाने अटक केली. पिशा चिचांग चँग असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

तक्रारदार हे पालिका कर्मचारी आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना एक मेसेज आला होता. एका आंतरराष्ट्रीय पंपनीत नोकरी असल्याचे त्यात नमूद होते. नोकरीच्या नावाखाली ठगाने त्यांच्याकडून काही कागदपत्रे घेतली. त्यानंतर नोकरीच्या भूलथापा मारून 35 लाख रुपये उकळले. पैसे भरल्यावर तक्रारदार यांना ठगांनी पुन्हा पह्न करून पैशांची मागणी केली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी 17 जणांना विविध ठिकाणांहून अटक केली. त्यांच्या चौकशीत पिशाचे नाव समोर आले. त्यानंतर उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी पिशाला मुंबईतून अटक केली. फसवणुकीचे पैसे तीन खात्यांत जमा झाले होते. ते पैसे पिशा हा क्रिप्टो करन्सीमध्ये बदलून तो परदेशात पाठवत असायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे. पिशा हा तैवानचा नागरिक असून त्याने आतापर्यंत किती पैसे परदेशात पाठवले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.