टेस्ट रॅकिंगमध्ये कोहली- रोहित पिछाडीवर; जो रूट ठरला अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जो रूट सध्या चांगलाच फॉर्मात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात जो रूटने धावसंख्येचा डोंगर उभा केला. त्याचा फायदा त्याला होत आहे. या मोठ्या धावसंख्येमुळे जो रुट टेस्ट रॅकिंगमध्ये अव्वल ठरला आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या रॅकिंगमध्ये जो रूट आघाडीवर आहे.

न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये सामने सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन कसोटीत अव्वल फलंदाज होता. आता जो रूटने त्याच्यावर मात करत अव्वल स्थान पटकावले आहे. आता जो रुटचे 897 अंक झाले आहेत. तर मार्नस लॅबुशेन 892 अंकांवर आहे. जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आघाडीवर असलेले 10 फलंदाज

टॉप-10 टेस्ट फलंदाज
जो रूट
मार्नस लैबुशेन
स्टीव स्मिथ
बाबर आजम
केन विलियमसन
डिमुथ करुणारत्ने
उस्मान ख्वाजा
रोहित शर्मा
ट्रेविस हेड
विराट कोहली

जो रुट पहिल्यांदा ऑगस्ट 2015 (917 रेटिंग मिळवून) टेस्ट रॅगिंगमध्ये अव्वल होता. डिसेंबर 2021 मध्ये जो रूट अव्वल होता. त्यानंतर त्याने पुन्हा हे स्थान पटकावले आहे. जो रूट 163 दिवस अव्वल स्थानावर होता. तर स्टीव्ह स्मिथ (1506 दिवस), विराट कोहली (469 दिवस) आणि केन विलियमसन (245 दिवस) टेस्ट रॅगिंगमध्ये अव्वल होते.

टिम इंडियाच्या फलंदाजामध्ये फक्त दोन फलंदाजांना पहिल्या 10 मध्ये स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा 754 रेटिंग मिळवत आठव्या स्थानावर आहे. तर 742 रेटिंग्स मिळवत विराट कोहली 10 व्या स्थानावर आहे. ते रॅगिंकमध्ये पिछाडीवर गेले आहेत.