जुहूतील मनिषा इमारतीत एसीचा स्फोट, आठ जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरीतल्या जुहू परिसरात असलेल्या मनिषा इमारतीच्या सहाव्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये एसीचा स्फोट झाला असून यात आठ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

सकाळी आठच्या सुमारास जुहूतील मनिषा इमारतीच्या सहाव्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये एसीच्या युनिटमध्ये आग लागली. या आगीतच गौतम झवेरी (86), रिचा गुप्ता (44), अल्पा (63), अनुषा (35), निपूल (52), सरला धारू(80) राहिल (36), कोकिला झवेरी (91) हे जखमी झाले होते. जखमींना तत्काळ भारती आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.