
रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कागर’ या चित्रपटाविषयी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, आता फॅन्सना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण रिंकूची बाराकीची परीक्षा असल्याने व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ‘कागर’ प्रदर्शित होणार नाही. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’चे दिग्दर्शन केले आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर रिंकूचा चित्रपट येत असल्याने ‘कागर’विषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ‘कागर’ प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे, असे निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केले.


























































