
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता इटकुर येथे मराठा आंदोलक आक्रमक झाले असून गुरुवारी आंदोलकांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाला पांठिबा म्हणून कळंब तालुक्यातील इटकूर येथील 12 जणांनी आमरण उपोषण चालू आहे. 2 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास गावातील प्रमुख चौकात एकत्र येऊन सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तिन जणांनी तिरडी हातात घेतली, ही अंत्ययात्रा गावातील विविध भागातुन काढून थेट गावातील सार्वजनिक स्मशानभूमी येथे गेली, तेथे परंपरेनुसार अग्नी देऊन दशक्रिया सुध्दा करण्यात आला आहे.
तरुणाची प्रकृती खालावली
इटकुर येथे अमरण उपोषणास बसलेले प्राणेश भिष्माचार्य गंभीरे या युवकाची तब्येत खालावली होती, उपोषण स्थळी सलाईन लावण्यात आले होते, मात्र तब्येत बिघडत असल्यामुळे सकाळी 10 वाजता कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.




























































