
वांद्रे येथील कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी लवकरच दूर होणार आहे. कलानगर उड्डाणपुलाचे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठेवले आहे. आतापर्यंत 73 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उड्डाणपूल पुढील वर्षीच्या जानेवारीमध्ये वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.
कलानगर येथे तीन उड्डाणपूल उभारले जात आहेत. पहिल्या उड्डाणपुलामुळे वाहनांना बीकेसी आणि कलानगर जंक्शन टाळून बीकेसी जंक्शनवरून वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत जाता येणार आहे. दुसरा उड्डाणपूल दोन पदरी असून सी-लिंकपासून बीकेसीपर्यंतच्या वाहतुकीसाठी तर तिसरा दोन पदरी उड्डाणपूल धारावी जंक्शन ते सी-लिंकपर्यंतच्या वाहतुकीसाठी सोयीचा ठरणार आहे अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.


























































