Video – कल्याण – धावती ट्रेन पकडताना पडला, RPF कॉन्स्टेबलने वाचवले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kalyan railway station (700 × 450 px)

धावती ट्रेन पकडताना ट्रेन आणि फलाटामध्ये असलेल्या जागेत पडून अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे. अशीच एक घटना कल्याण जंक्शनमध्ये सोमवारी घडली. RPF कॉन्स्टेबलने समयसूचकता दाखवून पडलेल्या व्यक्तीला वाचवले.

सोमवारी 07 फेब्रुवारी रोजी दुपारी 15.46 वाजता कल्याणच्या फलाट 4 वरून निघालेली ट्रेन क्रमांक 13202 DN मध्ये चढत असताना एक व्यक्ती फलाट आणि ट्रेनच्या मध्ये पडली. RPF कॉन्स्टेबल सोहनलाल एटा यांनी त्या व्यक्तीला बाहेर काढून वाचवले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, ‘त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा – उतरण्याचा प्रयत्न करू नये.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)