
विकेंड लॉकडाऊन नंतर पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळपासून कणकवली बाजारपेठत नागरिकांनी मोठी गर्दी केली. बाजारपेठेतील दुकाने सकाळी सुरु होताच ग्राहकांचीही गर्दी केली आहे. उद्या असलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसत होते. कणकवलीत लॉकडाऊनच्या भीतीने तुफान गर्दी झाल्याचे चित्र होते.
शनिवार-रविवार या दोन दिवशी विकेंड लॉकडाऊनचे नागरिकानी पालन केले. मात्र सोमवारी सकाळी कणकवलीतील व्यवहार सुरळीत झाले. बस स्थानकावरही प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. तसेच शासकीय कार्यालयात देखील विविध कामांसाठी नागरिकांची गर्दी दिसत होती.

























































