कराडच्या उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा हॉस्पिटलमध्ये लसीकरणास प्रारंभ

कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या सर्व विभागाबरोबर पोलिसांनीही सतर्कतेचे काम केले आहे. त्यांना ही लस देण्यात येणार आहे. लस टप्प्याटप्प्याने दिली जात असून महाविकास आघाडीने सर्वत्र सुसज्ज व्यवस्था केली आहे. लस दिल्यानंतर दक्षता घेण्यात आली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

कोविशिल्ड’ या लसीचे डोस देण्याचा शुभारंभ कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या लसीकरण मोहिमेसाठी रुग्णालयात स्वतंत्र केंद्र उभारण्यात आला आहे. लस दिल्यानंतर अर्धातास रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. ‘कोविशिल्ड’ या लसीचे 550 डोस कृष्णा हॉस्पिटलला उपलब्ध झाले असून, पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.

उपजिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळा अधिकारी अजय आमने यांना लस देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, डॉ. शिंदे, डॉ. अशोक गुजर, डॉ. कुऱ्हाडे, सभापती प्रवण ताटे, इंद्रजीत चव्हाण उपस्थित होते. कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉ. विश्वास पाटील यांना पहिली लस देण्यात आली.

कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, पी. डी. जॉन, डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. जी. वरदराजुलु, डॉ. वैशाली मोहिते, एस. ए. माशाळकर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या