कराडला रणजी सामना घेण्यासाठी प्रयत्नशील – रियाज बागवान

444

कराडला छत्रपती शिवाजी स्टेडियम असून क्रिकेटसाठी चांगले मैदान आहे. गेल्या काही वर्षांत येथे रणजी सामना झालेला नाही. यापुढील काळात ऍक्टीव्ह क्रिकेट सुरू करण्यावर आपला भर असणार आहे. स्टेडियम व मैदानाची चांगली देखभाल नगरपालिकेने केल्यास कराडला रणजी क्रिकेटचा सामना घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी दिली.

डिलक्स क्रिकेट ऍकॅडमीच्या वतीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल रियाज बागवान, असोसिएशनच्या मॅनेंजिंग कमिटीवर निवड झालेले ऍड. कमलेश पिसाळ, रणजी सिलेक्टर केतन दोशी यांचा सत्कार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी रियाज बागवान म्हणाले, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्यात क्रिकेटच्या वाढीसाठी खूप प्रयत्न करत असते. यापूर्वी महाराष्ट्र संघात केवळ शहरी भागातील खेळाडू असायचे. आता विविध जिल्ह्यांमधून खेळाडू येत असतात. कराडला चांगले मैदान आहे. भविष्यात रणजी सामना येथे घेण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी स्थानिकांनी मेहनत घेण्याची गरज आहे. रशिद शेख यांच्यासारखे प्रशिक्षक मिळणे हे कराडकरांचे भाग्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या