कर्नाटकात येडीयुरप्पा सरकार, बहुमत केलं सिद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yediyurappa1

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

कर्नाटकात सुरू असलेले राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले असून येडीयुरप्पा सरकारने सोमवारी सभागृहात बहुमत सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे यावेळी विरोधीपक्षाने मतविभाजनाची मागणी केली नाही. दरम्यान, बहुमत चाचणीनंतर बोलताना ‘आपण प्रत्येक क्षण हा राज्याच्या विकासासाठी देऊ’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी केले.

येडीयुरप्पा सरकारने विश्वासदर्शक ठरावाचे अग्निदिव्य पार केले आहे. सध्या 207 आमदार असलेल्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी 104 आकडा असणे आवश्यक होते. भाजपकडे 105 आमदार आहेत. त्यामुळे भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकून कर्नाटकमध्ये पुन्हा एका सरकार स्थापन केले आहे.