आयटी कर्मचाऱ्यांना करावे लागणार 14 तास काम

कर्नाटकमधील आयटी कर्मचाऱ्यांना 14 तास काम करावे लागू शकते. आयटी कर्मचाऱयांच्या कामांचे तास वाढवण्यासाठी आयटी कंपन्यांनी नवीन प्रस्ताव कर्नाटक सरकारला पाठवला आहे. जर कर्नाटक सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर कर्नाटकमधील आयटी कर्मचाऱयांना 14 तास काम करावे लागणार आहे. परंतु आयटी कंपन्यांच्या या प्रस्तावाला आयटी कर्मचाऱयांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. आरोग्याच्या समस्या आणि नोकरकपात असे सांगत हे सर्व अमानवी आहे, असे कर्मचाऱयांनी म्हटले आहे. राज्य सरकार कर्नाटक शॉप्स ऍण्ड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1961 मध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहेत. आयटी कंपन्यांना त्यांच्या प्रस्तावाचा या दुरुस्तीमध्ये समावेश करायचा आहे.