
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून सर्व पक्षांच्या नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही रविवारी बंगळुरूत एका डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटरवरून फेरफटका मारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राहुल गांधी यांच्या प्रचार सभांना कर्नाटकात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता येथील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने सर्वच नेत्यांनी थेट नागरिकांना भेटण्यावर भर दिला आहे. आज राहुल गांधी बंगळुरू येथे आपल्या गाडीतून उतरून लोकांशी संवाद साधत होते. तेव्हा तेथे एक डिलिव्हरी बॉय स्कूटरवर आला. तेव्हा राहुल यांनी डोक्यावर हेल्मेट घालत त्याच्यासोबत फेरफटका मारत बाईक राईडचा आनंद घेतला. तेव्हा राहुल यांची छबी आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले होते.




























































