केनियन महिलांची सोन्याची तस्करी पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीमा शुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. दुबईहून सोने घेऊन आलेल्या 18 केनियन महिलांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार किलो सोने जप्त केले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे. दुबई येथून काही महिला या सोने घेऊन आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. आज सकाळी 18 केनियन महिला आल्या होत्या. त्याच्या हालचाली सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्याने त्याना थांबवण्यात आले. त्याच्याकडील साहित्याची तपासणी करण्यात आली. त्या महिलांनी मसाल्याच्या पाकिटात, चपला आणि अंतर्वस्त्रामध्ये सोने लपवले होते.