केरळमध्ये 200 कोरोना बाधित विद्यार्थी आढळल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीचा प्रकोप कमी होत असून अनेक राज्यांत शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. केरळच्या मल्लापुराम जिह्यातील दोन शाळांमध्ये दहावीचे 192 विद्यार्थी आणि शिक्षकांसह 72 शालेय कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग सध्या केरळात आढळत आहे. त्यामुळे राज्यांच्या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केरळातील सर्व जिल्ह्यात शाळा आणि शालेय विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कोरोना उपचाराचे प्रमाण वाढवले आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत एक दिवसात कोरोना वायरस संसर्गाचे 6,075 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 9,68,438 झाली आहे.