अरेच्चा! पुलावरच बांधली लग्नगाठ, लॉकडाऊन लग्नाची अनोखी गोष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्न ज्याप्रमाणे दोन कुटुंबांना एकत्र जोडते त्याचप्रमाणे पूल हा दोन ठिकाणांना एकत्र जोडतो. या दोन्ही गोष्टींचा अनोखा संगम नुकताच पाहायला मिळाला आहे. अलीकडेच एक विवाह सोहळा हॉलऐवजी चक्क पुलाकर पार पडला. तामीळनाडू आणि केरळ या दोन राज्यांना जोडणारा हा पूल आहे.

कोरोनामुळे सध्या विवाह सोहळ्यांवर बंधने आहेत. एका राज्यातून दुसऱया राज्यात प्रवेश करायचा असेल तरी कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. आता टेस्ट करणे म्हणजे वेळ आणि पैसा जाणार. दोन्ही कुटुंबियांना हा खर्च परकडणारा नव्हता. या अडचणीतून मार्ग वाढत केरळच्या मारायूरचा रहिवाशी असलेला उन्नीकृष्णन आणि तमिळनाडूतल्या बाटलागुंडू इथली रहिवाशी असलेली थंगामाईल यांची लग्नगाठ 24 मे रोजी छिन्नर नदीच्या पुलावरच बांधली गेली. ही नदी तामीळनाडू आणि केरळ या राज्यांना भौगोलिकदृष्टय़ा वेगळं करते तर तिच्यावरचा पूल या राज्यांना जोडतो. गेल्या वर्षभरात या पुलावर चक्क 11 विवाह सोहळे पार पडले आहेत.