खंडाळी शिवारातून ट्रक पळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

अहमदपूर तालूक्यातील मौजे खंडाळी शिवारात बंद पडलेला ट्रक अज्ञातांनी पळवून नेला आहे. ट्रक बंद पडल्याने चालक मेकॅनिकला आणण्यासाठी गावात गेला होता. त्याचवेळी ट्रक चोरुन नेल्याची घटना घडली. या ट्रकची किंमत १ लाख ४० हजार रुपये एवढी आहे.

या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर तालूक्यातील मौजे वरवटी येथील नागोराव भागुजी सुरनर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. परळी येथून थर्मलची राख घेऊन येण्यासाठी अहमदपूर वरुन ते खंडाळी मार्गे परळीकडे ट्रक ( क्रमांक एम.एच.१२ डीजे.१८७४) जात होते. खंडाळी शिवारात समोरील लाईट बंद पडल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली. दुरुस्तीसाठी मेकॅनिकला आणण्यासाठी ते अहमदपूर येथे गेले. मेकॅनिक घेऊन ते परत आले असता ट्रक जागेवर नसल्याचे त्यांना आढळले. सुमारे १ लाख ४० हजार रुपयांच्या ट्रक चोरी प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.