
रिक्षा चोरीच्या गुह्यात दोन सराईत चोरटय़ांना खेरवाडी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इकबाल सिरताज अली शेख आणि मोहम्मद फरीद हाश्मी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेने रिक्षाचोरीच्या 12 गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 12 रिक्षा जप्त केल्या आहेत. रिक्षा चोरीच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. वरिष्ठ निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, मोरे, सावंत, ठोंबरे, ठाकरे, कांबळे, पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली. वाकोला येथे काही जण रिक्षाचोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद इकबाल आणि मोहम्मद फरीद या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांनी 12 हून अधिक रिक्षा चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हे दोघे जेथे सीसीटीव्ही पॅमेरे नसतात त्या ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षाचोरी करायचे. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.




























































