
माणसाला रोज साधारणपणे 7 ते 9 तासांची झोप ही आवश्यक असते. परंतु झोपेचा कालावधी वयानुसार हा बदलत असतो. वयस्कर (60 वर्षांपेक्षा जास्त) यांच्यासाठी 6-7 तास झोप पुरेशी आहे. तसेच प्रौढांसाठी (18-60 वर्षे) वयोगटासाठी 7-9 तास गरजेची असते. तरुण आणि किशोरवयीन (13-18 वर्षे) या वयोगटाच्या व्यक्तींनी किमान 8-10 तास झोपणे गरजेचे आहे.
शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल तर या भांड्यात अन्न शिजवा, वाचा
आपल्या शरीराला ताजेतवाने आणि उत्साही ठेवण्यासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे.
निद्रानाश- उशीरा झोपल्याने शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप मिळत नाही. यामुळे शरीरात थकवा, आळस निर्माण होतो.
हार्मोनल बिघाड- कमी झोप घेतल्याने शरीरातील हार्मोन्सच्या पातळीवर परीणाम होतो.
हृदयविकार – कमी झोपेमुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
वजनवाढ- रात्री उशीरा झोपल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
ताण आणि चिंता- पुरेशी झोप न झाल्याने, मनावर ताण पडतो. यामुळे चिंता नैराश्य आणि मानसिक आजार वाढतात.
एकाग्रतेचा अभाव- कमी झोपेमुळे एकाग्रता कमी होते. तसेच आपल्या एकूणच कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
मूड स्विंग्स- झोप कमी झाल्यामुळे, चिडचिडेपणा वाढतो.























































