बेळगाव येथे गाडी नाल्यात कोसळून अपघात, सात कामगार जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेळगाव येथील सांबरा परिसरात नाल्यात गाडी कोसळून झालेल्या अपघातात सात कामगार ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गाडी ओव्हरटेक करताना चालकाचे भरधाव वेगात असणाऱ्या गाडीवरील वरील नियंत्रण सुटल्याने, गाडी थेट नाल्यात कोसळली व सात कामगार ठार झाले. यात पाच जण गंभीर जखमी झाले असुन, यातील‌ चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

गोकाक येथुन‌ हे‌ कामगार बेळगाव मधील सांबरा येथे कामासाठी येत असताना, कल्याळ ब्रिज जवळ वळणावर आज सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये अडिव्यपा चिलभावी (27), बसवराज चंद्राप्पा दळवी (30), बसनु हनमंणावर(51), क-याप्पा गस्ती (22), फकिरप्पा कळसन्नावर (55 सर्व रा. अक्कतंगेरहाळ) व कृष्णा कंडोरी दासनट्टी (30, रा.दासनट्टी, सर्व ता.गोकाक) अशी या मृत झालेल्या कामगारांची ओळख पटली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालकासह 12 कामगार क्रुझर गाडीने गोकाक कडून बेळगावकडे येत होते. कल्याळ ब्रिज जवळ ओव्हरटेक करताना चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले. यावेळी गाडी तीन वेळा पलटी होत, बळळारी नाल्यात कोसळली. या अपघातात सात जण जागीच ठार झाले. तर पाचजण जण गंभीर जखमी झाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अक्कतंगेरहाळ,ता. गोकाक परिसरातील मजूर तीन क्रूझरने सांबरा – सुळेभावी रेल्वे मार्गावर सुरु असलेल्या कामावर मजुरीसाठी जात आहेत.आजही सकाळी तीन कुझरमधून गोकाक-बेळगाव मार्गावरून निघाले असता,गाडी पुढे-मागे वेगाने पळविण्याच्या प्रयत्नात एका चालकाचे क्रूझर वरील नियंत्रण सुटुन,हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी -कडून सांगण्यात येत आहे.

मारिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना उपचारासाठी बेळगावातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी बेळगावचे पोलीस आयुक्त एम.बी.बोरलिंगय्या यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून मुख्यमंत्री बोम्मई यांनी मृत्यू झालेल्या मजूरांना तात्काळ ५ लाखाची मदत जाहिर केली आहे.