Kolhapur By-election – जयश्री जाधव विजयी, महाविकास आघाडीने विजयाचा गुलाल उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. आजी-माजी पालकमंत्र्यांसह महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि दुपारपर्यंत निकाल हाती आला. त्यानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. निकाल हाती येताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि पेढे वाटून, गुलाल उधळून आनंद साजरा केला.

कोल्हापूरच्या जनतेने शब्द पाळला. जनतेने आपला स्वाभिमान राखत महाविकास आघाडीला विजयी केले, असे म्हणत विजयी उमेदवार जयश्री जाधव यांनी कोल्हापूरच्या जनतेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले. कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा असून महाविकास आघाडीचा विजय होणार नक्की होते. विजयाचा आनंद असून आण्णांचे स्वप्न पूर्ण होत आहे. जनतेची सेवा करायची असून आण्णांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच आण्णांच्या अचानक निधनानंतर भाजपने मोठे मन दाखवायला हवे होते, असे म्हणत जयश्री जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला.

  • जयश्री जाधव यांना 94 हजार 767 मतं मिळाली, तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 76123 मतं मिळाली
  • जयश्री जाधव यांचा 18644 मतांनी विजय
  • 18 व्या फेरीनंतर जयश्री जाधव यांना 13855 मतांची निर्णायक आघाडी
  • 18 व्या फेरीनंतर मविआच्या जयश्री जाधव यांना एकूण 68732 तर भाजपच्या सत्यजित कदम यांना एकूण 54877 मते मिळाली
  • 16 व्या फेरीनंतर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना 61989 मते मिळाली
  • 13 व्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना एकूण 50807 मते मिळाली
  • 12 व्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना एकूण 39628 मते मिळाली
  • 12 व्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना एकूण 46421 मते मिळाली
  • 12 व्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना एकूण 37236 मते मिळाली
  • 11 व्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना एकूण 42475 मते मिळाली
  • 11 व्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना एकूण 34328 मते मिळाली
  • दहाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना एकूण 39605 मते
  • दहाव्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना यांना एकूण 31572 मते
  • नवव्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना एकूण 36737 मते
  • नवव्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना यांना एकूण 27778 मते
  • आठव्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना एकूण 33993 मते
  • आठव्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना यांना एकूण 24841 मते
  • सातव्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना एकूण 31012 मते
  • सहाव्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना यांना एकूण 21336 मते
  • सहाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना एकूण 27380 मते
  • सहाव्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना यांना एकूण 18905 मते
  • पाचव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना एकूण 22681 मते
  • पाचव्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना यांना एकूण 15933 मते
  • पाचव्या फेरीअखेर मविआच्या जयश्री जाधव यांची आघाडी कायम
  • तिसऱ्या फेरीअखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना यांना एकूण 11735 मते मिळाली
  • तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना एकूण 19008 मते मिळाली
  • दुसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना एकूण 10371 मते तर सत्यजित जाधव यांना एकूण 5224 मते मिळाली
  • दुसऱ्या फेरीत भाजपच्या सत्यजित कदम यांना 2513 तर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 5515 मते मिळाली
  • काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांची आघाडी कायम
  • या मतदारसंघात 10 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत
  • भाजपच्या सत्यजित कदम यांना पोस्टल मतांच्या मोजणुकीत 2712 मते मिळाली
  • पोस्टल मतांच्या मोजणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना 4856 मते मिळाली
  • एकूण 15 उमेदवार कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे
  • पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात
  • उत्तर कोल्हापूर मतदारसंघातून निवडून येणारी पहिला महिला आमदार हा मान जयश्री जाधव यांना मिळेल
  • ही निवडणूक भाजपने लादली, इथे बिनविरोध निवडणूक होणं अपेक्षित होतं- सतेज पाटील, पालकमंत्री
  • मुख्यमंत्र्यांचं जयश्री जाधव यांना पाठबळ होतं- ऋतूराज पाटील, काँग्रेस आमदार
  • ही निवडणूक भाजप विरूद्ध कोल्हापूर जनता -ऋतूराज पाटील, काँग्रेस आमदार