कोपरगावात सराफाला अडीच लाखाला लुटले

899

जवळके येथे तीन अज्ञात व्यक्तींनी सराफी व्यवसाय करणाऱ्यास रोकड व सोन्याचे दागिने यासह अडीच लाख रुपयांना लुटल्याची घटना गुरुवारी कोपरगाव येथे घडली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी तीन संशयितां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महेंद्र मुरलीधर कुलकर्णी वय 48 धंदा रा. सिध्दीविनायक टॉवर्स सप्तर्षी मळा, कोपरगाव यांचा तालुक्यातील जवळके येथे सराफी व्यवसाय आहेत. गुरुवारी (12) सायंकाळी जवळके येथील ज्वेलर्सचे दुकानातील कामकाज आटोपुन त्याचे पॅशन प्रो मो.सा.वरुन कोपरगावकडे येत असतांना हॉटेल माईलस्टोन जवळ पाठीमागुन एका काळ्या रंगाचे मो.सा.वरुन त्यांनी कुलकर्णी यांच्या मोटरसायकलसमोर त्यांची मोटरसायकल आडवी लावून त्यांचा रस्ता रोखला. त्यानंतर कोयता ,तलवारीचा धाक दाखवुन त्यांना खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याजवळील 18 हजाराची रोकड व 80 ग्रॅम सोन्याचे दागीणे असलेली पिशवी लंपास केली. या मारहाणीत फिर्यादी कुलकर्णी हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बारसे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या