कोपरगाव – गाडीला अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात, ठाणे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गावर सकाळी 6 वाजता ह्युंदाई वेरना कारला (क्र.एम.एच.05 के.700) अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. कार चालक सचिन सोपान पाटील व त्याचा मित्र अल्पेश प्रदीप गुरव (वय-27) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.या बाबत तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिलेली माहिती अशी, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर तालुक्यातील धोत्रे शिवारात आज सकाळी 6 वाजेदरम्यान धोत्रे शिवारात ह्युंदाई वेरना या कारला (एम.एच.05 के.700) अज्ञात वाहनाने धडक दिली. त्या अपघातात कार चालक सचिन सोपान पाटील (वय-29) रा. कोळसेवाडी कल्याण हा स्वतः व त्याचा मित्र अल्पेश प्रदीप गुरव (वय-27) रा. कोळसेवाडी कल्याण जि. ठाणे हे दोघे जागीच जण ठार झाले.

दरम्यान या प्रकरणी विजय लोटन पाटील (वय-32, रा.जे.पी.कॉलनी गायकवाड वाडा अंबरनाथ पूर्व अंबरनाथ ता. कल्याण जि.ठाणे) यांनी तालुका पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणी वरील अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तपास अधिकारी पोलीस हे.कॉ. संतोष लांडे आदींनी घटनास्थळी भेट दिली.