ओला दुष्काळ जाहीर करा, कोपरगाव शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पाहता कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. मागण्या पूर्ण नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देत निवेदन देण्यात आले आहे.

कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. कोपरगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा राज्यपाल यांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. केंद्र व राज्याकडून योग्य ती मदत देतांना शेतकऱ्यांना दर हेक्टरी 25 हजार रुपये प्रमाणे मिळावी. पीकविमा कंपनी काही तासाच्या आत नुकसान झाल्याचा अर्ज करायला सांगते. या कंपन्या शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांची फरफट करीत आहेत. विमा कंपन्यांची बनवेगिरी खपून घेणार नाही. शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (25) सकाळी 11 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चाने जाऊन तहसीलदार तहसीलदार योगेश चंद्रे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे आदींसह सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

आंदोलकांच्या मागण्या…
ओला दुष्काळ जाहीर करा,पंचनामे करून भरपाई द्या, हेक्टरी 25 हजार मदत द्यावी, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, रब्बीसाठी कर्जपुरवठा करावा, रब्बीसाठी मोफत बी, बियाण द्या, रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करा.