
कोरियन महिला त्यांच्या त्वचेचे सौंदर्यासाठी तांदळाचे पाणी अनेक प्रकारे वापरतात. जसे तांदळाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्याने त्वचेवर चमक येते. ही पद्धत आधी वापरून पाहिली नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच वापरून पाहिले आहे का. नसेल तर चेहऱ्यावर तांदळाचे पाणी वापरण्याची योग्य पद्धत आणि त्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी बघूया.
आपण त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येबद्दल चर्चा करतो तेव्हा, कोरियन महिलांच्या सौंदर्याबद्दल हमखास चर्चा होते. काचेसारख्या चमकदार त्वचेच्या वरदानाने युक्त कोरियन महिला देखील त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध प्रयत्न करतात. त्वचेची काळजी घेण्याचे असेच एक रहस्य म्हणजे तांदळाचे पाणी.
Beauty Tips – खास सणा-समारंभात सुंदर दिसण्यासाठी फक्त या गोष्टी फाॅलो करा, वाचा
त्वचेसाठी तांदळाचे पाणी कसे बनवायचे?
तांदळाचे पाणी बनवण्यासाठी, एक लिटर पाण्यात1-2 चमचे कच्चे तांदूळ मिसळले जातात. तुम्ही त्यांना काही तास पाण्यात भिजवू शकता आणि नंतर या पाण्याने तुमचा चेहरा धुवू शकता. तुम्ही भात शिजवण्यापूर्वी भिजवला तर तांदूळ गाळल्यानंतर उरलेले पाणी त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील वापरू शकता.
चेहऱ्यावर तांदळाचे पाणी कसे लावावे?
सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर चमक येते. याशिवाय, तुम्ही तांदळाचे पाणी त्वचेवर या प्रकारे देखील लावू शकता.
तांदळाच्या पाण्यात कापूस बुडवून चेहऱ्यावर लावा. नंतर, त्यानी तुमचा चेहरा मसाज करा आणि कापसाने पुसून स्वच्छ करा.
त्वचेवर चमक आणण्यासाठी आपण तांदळाचे पाणी टोनर म्हणून देखील वापरू शकता. यासाठी तांदळाचे पाणी एका स्प्रे बाटलीत भरा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा चेहरा निस्तेज किंवा थकलेला दिसतो तेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर तांदळाचे पाणी स्प्रे करू शकता.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)