अमिताभ बच्चन यांना आवडला क्रिती सेननचा ग्लॅमरस अवतार, म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या अनेक चाहत्यांना आवडले आहेत. तिच्या चाहत्यांव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींनाही तिचे फोटो आवडले असून ते त्यावर लाईक आणि कमेंट्स करत आहेत. कमेंट्स करणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.

क्रितीच्या फोटोवर आतापर्यंत हजारो लोकांनी कमेंट्स केली आहे. ज्यात अनेक लोकांनी तिला गॉर्जियस, कूल आणि ब्युटीफुल म्हटले आहे.

तिच्या चाहत्यांनंतर अमिताभ बच्चन यांनी ही कमेंट करत करत ‘वाह ‘ असं लिहिलं आहे. यासोबतच त्यांनी रेड हार्ट ईमोजी शेअर केला आहे. अमिताभ यांच्या कमेंटवरून कळतं की त्यांना क्रितीचा हा अवतार खूप आवडला आहे.


View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)