कुमार गट कबड्डी स्पर्धा; महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुमार गट राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला 38-32 असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली. त्यांची अंतिम लढत चंदिगड संघाला 66-25 असे पराभूत करणाऱया हरयाणा संघाशी होईल. मुलांसोबत मुलींनाही पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे या स्पर्धेतील महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले आहे.

अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात साईने पहिला लोण देत विश्रांतीला 19-15 अशी आश्वासक आघाडी घेतली होती. उत्तरार्धात सावध खेळ करीत ती आपल्या हातून निसटणार नाही यांची पूर्ण काळजी घेतली आणि साईने 6 गुणांनी विजय साकारला. हरजितसिंग कौर, मानसी रोडे,  समृद्धी कोळेकर या चढाईपटूंनी कामगिरी चोख पार पाडली, पण मुलांप्रमाणे महाराष्ट्राच्या मुलींचा संघ बचावात कमी पडला. याचा परिणाम पराभवात झाला.